नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उंटवाडी येथील माध्यमिक शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचा शिक्षकाने विनयभंग केला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात संशयित शिक्षकाविरोधात विनयभंग आणि बाल लैंगिर अत्याचार संरक्षण अधिनियम ( पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंटवाडी परिसरातील माध्यमिक शाळेत गेल्या शुक्रवारी (दि.६) दुपारी दोन वाजता ही घटना घडली. संशयित शारीरिक शिक्षक रविंद्र नाकील याने पिडीत विद्यार्थिनीसोबत नको तेवढी जवळीक साधत गैरवर्तन केले. घाबरलेल्या विद्यार्थिनीने ही बाब घरी गेल्यानंतर आपल्या पालकांना सांगितल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून,पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शिक्षक रविंद्र नाकील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.
……..