नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नरफाटा भागात कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्यास शिवीगाळ करीत फायटरने मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी मारहाण व शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यालयातून बाहेर काढल्याने टोळक्याने ही मारहाण केली. सकलेन फिरोज शेख,प्रमोद जाधव,आकाश व अन्य चार जण अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी कृऊबाचे एकलहरा सदस्य अशोक दत्तात्रेय पाळदे (रा.शेवगेदारणा ता.जि.नाशिक) यांनी तक्रार दाखल केली आहे. पाळदे शनिवारी (दि.७) सिन्नर फाटा येथील आपल्या कार्यालयात असतांना ही घटना घडली. कृऊबा आवारात संशयित व मोसिन शामद पठाण आणि याकूब शामद पठाण यांच्यात वाद सुरू होता. या घटनेत टोळक्याने दोघांना शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत टोळक्यासह दोघे जखमींनी कृऊबा सदस्य पाळदे यांच्या कार्यालयात धाव घेतली. यावेळी पाळदे यांनी सर्वांना कार्यालयाबाहेर जाण्यास सांगितल्याने ही घटना घडली. संतप्त संशयितांनी पाळदे यांना शिवीगाळ करीत त्यांच्या तोंडावर लोखंडी फायटरने मारून जखमी केले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेळके करीत आहेत.