नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लेखानगर भाजी मार्केट मध्ये भाजीपाला विक्री व्यवसाय करणा-या एकास टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत भाजीविक्रेता जखमी झाला असून गोविंद दिलीप कापसे (रा.इंदिरानगर वसाहत क्र.१ लेखानगर) असे जखमी भाजीविक्रेत्याचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कापसे गुरूवारी (दि.५) सकाळच्या सुमारास लेखानगर भाजी मार्केट मध्ये नेहमीप्रमाणे आपला व्यवसाय सांभाळत असतांना ही घटना घडली. अज्ञात तीन ते चार जणांच्या टोळक्याने अचानक येवून कापसे यांच्यावर हल्ला केला. संतप्त टोळक्याने शिवीगाळ व दमदाटी करीत त्यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. अधिक तपास पोलिस नाईक शिरवले करीत आहेत.