नाशिक : श्रीकृष्ण हॉस्पिटल जवळ कुटुंबिय बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी बंद घरफोडून ३० हजाराचा ऐवज चोरून नेला. त्यात साडे चार हजाराची रोकडसह मनगटी घड्याळ आणि सोन्याचांदीचे दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमरानोद्दीन चिरागोद्दीन मुल्ला (रा.धनश्री अपा.श्रीकृष्ण हॉस्पिटल जवळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मुल्ला कुटुंबिय ६ ते १० जुलै दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून लोखंडी कपाटातील रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे, दोन मगगटी घड्याळ व मोबाईल असा सुमारे २८ हजार ९०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलिस नाईक शिंदे करीत आहेत.