औद्योगीक वसाहतमध्ये २० वर्षीय तरूणावर तीन जणांच्या टोळक्याने केला कोयत्याने हल्ला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २० वर्षीय तरूणावर तीन जणांच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला केल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात घडली. या घटनेत युवक जखमी झाला आहे. याप्रकरणी आकाश पवार (रा.पवार मळा,पिंपळगाव बहुला) यांनी तक्रार दाखल केली असून सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज लेणे,कुणाल चव्हाण व मुकेश मगर अशी संशयितांची नावे आहेत. या घटनेत निखील अनिल पवार या युवक जखमी झाला आहे. निखील पवार हा बुधवारी (दि.४) सायंकाळच्या सुमारास अशोकनगर येथील छोटू वडापाव दुकानाजवळ उभा असतांना ही घटना घडली. संशयित व पवार यांच्यात शाब्दीक चकमक झाली. यावेळी संतप्त त्रिकुटाने त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढविला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडले
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाथर्डीफाटा परिसरातील कवडे नगर येथे रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडल्याची घटना घडली. या चोरीप्रकरणी भारती प्रमोद खातळे (३१ रा.इच्छामणी कॉलनी,गजानन नगर जे.डी.सावंत कॉलेज मागे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून इंदिरानगर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खातळे या गुरूवारी (दि.५) सायंकाळच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. कवडे नगर येथील जे.डी.सावंत रोडने त्या पायी जात असतांना ही घटना घडली. रेणूका नर्सिंग समोरून त्या पायी जात असतांना मोपेड दुचाकीवर आलेल्या भामट्यांपैकी एकाने त्यांच्या गळयातील सुमारे ४५ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक मनिषा शिंदे करीत आहेत.