नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या पतीस फारकत घेण्यास भाग पाडून हा बलात्कार केल्याचे समोर आले. संशयिताने मारहाण केल्याने हा प्रकार पोलिसात पोलिस स्थानकात पोहचला. संशयित आणि पीडिता महात्मानगर भागात राहत असून दोघेही विवाहीत आहेत. फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. संशयिताने महिलेचा विश्वास संपादन करून तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्यासाठी त्याने महिलेस पहिल्या पतीसमवेत घटस्फोट घेण्यास भाग पाडले. याकाळात त्याने वेळोवेळी महिलेवर बळजबरीने बलात्कार केला. कालांतराने दोघांमध्ये बिनसल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली होती. मात्र तत्पूर्वी संशयिताने न्यायालयातून अटकपूर्व जामिन मिळविल्याने पोलिसांकरवी दोघांमध्ये समझोता झाला होता. परंतू याच कारणातून दोघांमध्ये वाद होवून संशयिताने शिवीगाळ करीत महिलेस मारहाण केल्याने तिने पोलिसात धाव घेतली असून पोलिसांनी संशयितास अटकेबाबतची नोटीस बजावली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक महेश येसेकर करीत आहेत.