नाशिक : महामार्गावरील मेडिकल कॉलेज फाटा भागात परप्रांतीय २५ वर्षीय कामगाराने गॅरेजमध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केली. मोहम्मद रशिद मोहम्मद तम शेख (रा.बाहुली जि.मुज्जफरजुद, बिहार) असे मृत तरूणाचे नाव आहे. शेख याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेख महामार्गावरील मेडिकल कॉलेज फाटा परिसरातील मुक्सान टायर रिमोल्डींग या गॅरेज मध्ये कामास होता. सोमवारी (दि.११) रात्री शेख व मालक मोहम्मद खुदादिन निसार हे दोघे जेवण करून गॅरेजमध्येच झोपले होते. मध्यरात्री शेख याने अज्ञात कारणातून गॅरेजमधील लोखंडी अॅगलला उपरणे बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मोहम्मद निसार यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक उपनिरीक्षक अभिमन्यू गायकवाड करीत आहेत.