नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लाखलगाव येथे चोरट्यांनी हार्डवेअर अॅण्ड इलेक्ट्रीकचे दुकान फोडून गल्यातील रोकडसह सुमारे ६३ हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या चोरीची तुषार वर्धमान चोरडिया (रा.गंगावाडी,रविवार कारंजा) यांनी तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरडीया यांचे लाखलगाव येथे जैन हार्डवेअर अॅण्ड इलेक्ट्रीक नावाचे दुकान आहे. गेल्या २७ डिसेंबर रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद दुकानाचा मागील दरवाजाचे कुलूप तोडून ही चोरी केली. दुकानात शिरलेल्या चोरट्यांनी गल्यातील १७ हजार ५०० रूपयांची रोकड तसेच पिस्टन मशिनचे वेगवेगळया कंपनीचे पितळी सामान,पाण्याच्या मोटरचे स्टार्टर, ट्रॅक्टरची गुटखी,बॅटरी टर्मिनलचे बॉक्स,रस्सी बडल व कुलपांचे तीन बॉक्स असा सुमारे ६३ हजार १०० रूपये किमतीचा माल चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक पाथरे करीत आहेत.