नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कॅनोलरोडवरील अम्रपाली नगर भागात कारमधून आलेल्या टोळक्याने तरुणास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत तरुण जखमी झाला आहे. या मारहाणाची अरविंद निंबाजी काळे (२८ रा.आम्रपालीनगर कॅनोलरोड) या युवकाने तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुन्ना जाधव, मायकल निंबाळकर, प्रशांत जाधव व त्यांचे अन्य साथीदार अशी संशयितांची नावे आहे. अरविंद काळे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घराजवळील म्हसोबा मंदिर समोर परिसरातील नागरीकांसमवेत गप्पा मारत उभा असतांना ही घटना घडली. लाल रंगाच्या कारमधून आलेल्या टोळक्याने त्यास जवळ बोलावून घेत लहान भाऊ प्रविण काळे याची विचारपूस केली. याप्रसंगी प्रविण कुठे आहे तो खूप माजलेला दिसतो असे म्हणत टोळक्याने शिवीगाळ करीत अरविंद काळे यास लाथाबुक्यांनी व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या घटनेत काळे जखमी झाला असून त्याचा मोबाईलही संशयितांनी फोडून टाकल्याने नुकसान झाले आहे. अधिक तपास हवालदार बकाल करीत आहेत.