नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडाळानाका भागातील नागसेननगर भागात गोडावून फोडून चोरट्यांनी सुमारे एक लाखाचे स्पेअरपार्ट चोरून नेले. या गोडावूनमध्ये चोरी करणार सर्व जण सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाले आहेत. शेख आजम तकी अहमद (रा.व्होकार्ट हॉस्पिटलमागे,आझादनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमद यांचा स्पेअर पार्ट विक्रीचा व्यवसाय असून नागसेन नगर भागातील मयूर गॅस एजन्सी परिसरात त्यांचे गोडावून आहे. सोमवारी अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून गोडावूनमधील ब्रेक बुस्टर, क्लच शाप्ट,हब ०४,पिस्टन सेट,बॅट-या तसेच इंजन पार्टस असा सुमारे एक लाखाचा ऐवज चोरून नेला. ही घटना सीसीटिव्ही यंत्रणेत कैद झाली असून तीन चोरट्यांनी हे गोडावून फोडल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. अधिक तपास हवालदार सोनार करीत आहेत.