नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गॅसचा भडका उडाल्याने २७ वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्हा रूग्णालयात गेले पाच दिवस ही महिला मृत्यूशी झुंज देत होती. रेखा कमलाकर भोये (रा.कारगील चौक,दत्तनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. औद्योगीक वसाहतीतील दत्तनगर भागात भोये या गेल्या २९ डिसेंबर रोजी आपल्या घरात स्वयंपाक करीत असतांना ही घटना घडली होती. स्वयंपाक करीत असतांना अचानक गॅसचा भडका उडाल्याने त्या गंभीर भाजल्या होत्या. चेह-यासह छातीस व पाठीस आगीने भाजल्याने त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेली पाच दिवस त्याच्यावर उपचार सुरू असतांना मंगळवारी (दि.३) वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.