नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवत महिलेवर बलात्कार करणा-या विरुध्द उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत महिलेची आर्थिक फसवणूक केल्याचेही समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका इसमाने आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवत अनेकांचा विश्वास संपादन केला. त्यात या पीडित महिलेचा देखील समावेश होता. या विश्वासाचा फायदा घेऊन या इसमाने पीडित महिलेची पहिले आर्थिक फसवणूक केली. त्यात घर देण्याचे आमिष दाखवून पाच लाख रुपये उकळले. त्यानंतर महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर पीडित महिलेने पोलिस स्थानकात धाव घेत तक्रार केली. या तक्रारीवरुन उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आता पोलिस करत असून यात आणखी कोणाची फसवणूक झाली आहे का याचाही शोध घेतला जात आहे.