नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात राहणा-या दोघांचा चक्कर येवून पडल्याने मृत्यू झाला. त्यात ६५ वर्षीय महिलेचाही समावेश आहे. याप्रकरणी अंबड आणि पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.पहिली घटना मालेगाव स्टॅण्ड भागात घडली. ईश्वरी अशोक चिचाडीया (६५ रा.वैष्णवरोड मालेगावस्टॅण्ड) या सोमवारी दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अचानक चक्कर येवून पडल्या होत्या. कुटुंबियांनी त्यांना तातडीने संदर्भ हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ. वनिता घुटे यांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत. दुसरी घटना सिडकोत झाली. येथील नितीन लक्ष्मण जगताप (६४ रा.तुळशी विहार,आयोध्यानगर पंचक) हे रविवारी रात्री सिडकोतील प्रितेश विनोद जगताप (रा.पाटीलनगर) यांच्या घरी गेले होते. बाथरूममधून बाहेर आले असता ते अचानक चक्कर येवून पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास दुखापत झाल्याने जगताप यांनी तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत अंबड पोलिस ठाम्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार माळोदे करीत आहेत.