नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकलहरा भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे १ लाख ३६ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात ८० हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे आणि गॅस सिलेंडर आणि मिक्सरचा समावेश आहे. याप्रकरणी शांताबाई बन्सी रोठे (रा.देशमुखवाडी पहाडेबाब,एकलहरा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोठे कुटूंबिय शनिवारी (दि.२८) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली ८० हजाराची रोकड, तीन पदरी सोन्याची पोत, कानातील कर्नफुले तसेच सिलेंडर टाक्या आणि घरगुती मिक्सर असा सुमारे १ लाख ३६ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेळके करीत आहेत.