नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळाली कॅम्प येथील पवन हॉटेल समोर सायकलवरून पडल्याने ६६ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. संसरीगाव सुखदेव दौलत सावळे (रा.संसरीगाव,दे.कॅम्प) असे मृत सायकलस्वाराचे नाव आहे. सावळे यांच्यावर कॅन्टोमेंट हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. याप्रकरणी पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सावळे शुक्रवारी (दि.३०) दुपारच्या सुमारास देवळाली कॅम्प येथील हॉटेल पवन समोरून आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली होती. अचानक सायकलवरून पडल्याने ते जखमी झाले होते. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ कॅन्टोमेंट हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैदयकिय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार पानसरे करीत आहेत.