नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागातून दोन मोटरसायकली चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी पंचवटी आणि उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना नाशिकरोड भागात घडली. दिपक साहेबराव शिंदे (रा.ब्राम्हणगाव ता.निफाड) हे गेल्या बुधवारी (दि.२१) नाशिकरोड भागात कामानिमित्त गेले होते. खान पेट्रोल पंपा पाठीमागील ओमकार हॉस्पिटल समोर त्यांनी आपली बॉक्सर एमएच १५ बीई १५८४ पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली.याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार सातभाई करीत आहेत. दुसरी घटना पंचवटी मार्केटमध्ये घडली. द्वारका परिसरातील अमोलकुमार नथू बांडे (रा.काठेगल्ली) हे गेल्या ५ डिसेंबर रोजी पंचवटीतील मार्केट यार्डात गेले होते. ए.आर.के.व्हेजीटेबल कंपनीच्या गाळयासमोर पार्क केलेली त्यांची स्प्लेंडर एमएच १५ बीएल २५९१ चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक सानप करीत आहेत.