नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कुलकर्णी गार्डन भागात दुचाकीवरून चक्कर येवून पडल्याने ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. नबीउल्ला इबारत खलिफा (५४ रा.बजरंगवाडी) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. खलिफा हे मंगळवारी (दि.२७) रात्री पत्नीस सोबत घेवून दुचाकीवर डबलसिट प्रवास करीत असतांना ही घटना घडली होती. खलिफा दांम्पत्य आपल्या दुचाकीने कॅनडा कॉर्नरच्या दिशेने प्रवास करीत असतांना कुलकर्णी गार्डन भागात अचानक चक्कर आल्याने खलिफा दुचाकीवरून पडले होते. या घटनेत ते बेशुध्द झाल्याने त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता डॉ.राम पाटील यांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक गांगोडे करीत आहेत.