नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यातील विवाहीतेने विषारी औषध सेवन करून तर युवकाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. पहिली घटना विहीतगाव येथे घडली. मनोज ज्ञानेश्वर देवकर (२२ रा.कोठुळे मळा,मथुरारोड) या युवकाने बुधवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्याच्या लोखंडी हुकास टॉवेल बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. दोन्ही घटनांप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात वेगवेळ््या मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास अनुक्रमे उपनिरीक्षक गोसावी आणि पोलिस नाईक शेख करीत आहेत. दुसरी घटना प्रणाली प्रशांत भालेराव (२९ रा.श्रीहरी विला अपा.करंजकरनगर दसक) या महिलेने केली. त्यांनी सोमवारी (दि.२६) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच भाऊ शशांत दाणी यांनी त्याना तातडीने बिटको रूग्णालया मार्फत जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला.