नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आ.नितेश राणे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात औद्योगीक वसाहतीसह सिडकोतील गुन्हेगारी आणि अवैध धंद्याबाबत मांडलेल्या लक्षवेधीनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख यांची अप्पर संचालकांमार्फेत चौकशी तर गेल्या दहा वर्षापासून या पोलिस ठाण्यात तळ ठोकणा-या एका कर्मचा-याची तातडीने बदली करण्याचे आदेश दिले आहेत.
अंबड हद्दीत एका तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकणात गुन्हा दाखल होत नव्हता. हे प्रकरण आमदार नितेश राणे यांच्यापर्यंत पोहोचल्यावर निरीक्षकासह कर्मचा-याची कुंडली काढण्यात आली. संबधिताच्या अवैध मालमत्तेसह वसुलीचे दाखले मिळाल्यानंतर बुधवारी (दि.२८) विधिमंडळात लक्षवेधी मांडण्यात आली. त्यावरुन वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देखमुख यांची अपर महासंचालक (एडीजी) तर्फे चौकशी होईल. महिन्याभरात हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबधीत अधिकाºयावर कारवाईचा निर्णय होईल. तसेच गेल्या दहा वषार्पासून अंबड पोलिस ठाण्यात कार्यरत प्रशांत नागरे या कर्मचा-याची तातडीने बदली करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
नागरे यास गेल्या दहा वर्षांपूर्वी या पोलिस ठाण्यात चालक पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर वरिष्ठांशी जवळीक साधून त्याने अवैध धंद्यांची वसुली चालू करत अधिका-यांची मर्जी राखली. तत्कालीन आयुक्तांनी काही महिन्यांपूर्वी पोलिस अंमलदारांच्या बदल्या केल्या. त्यामध्ये नागरेच्या बदलीला एकवर्ष स्थगिती मिळाली होती. यामुळे नव्याने नागरेची बदली कुठे होणार यासह आयुक्त अंकुश शिंदे याप्रकरणी काय भूमिका घेणार याकडे नाशिक पोलिसांचे लक्ष आहे.
https://twitter.com/NiteshNRane/status/1608159685043171333?s=20&t=fG8TJ784TjzoB0UMrCRCWA