नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महात्मानगर भागात घर फोडून चोरट्यांनी सुमारे दीड लाखाचा ऐवज लंपास केला. या घफोडीत चोरट्यांनी ८० हजाराची रोकड, अंगठी व चांदीच्या भांडे चोरुन नेले. या चोरीची तक्रार अभिषेक प्रमोद रानडे (रा.प्लॉट नं. २२१ पोलिस चौकीमागे महात्मानगर) यांनी दिली असून गंगापूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रानडे कुटुंबिय २२ ते २७ डिसेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असतांना ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या किचनच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. घरात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातील सोन्याची अंगठी,रोकड आणि चांदीचे सुमारे दिड किलो वजनाचे भांडे असा सुमारे १ लाख ४३ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक येसेकर करीत आहेत.