नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विवाहीत महिलेचा शेजा-याने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास अटक करण्यात आली आहे. जयेश सुरेश लोखंडे (३४ ) असे संशयिताचे नाव आहे. संशयिताने वेगवेगळया कारणातून महिलेच्या घरात जावून व सोसायटीच्या जीन्यात महिलेचा विनयभंग केल्यामुळे महिलेने पोलिसात धाव घेतली आहे. संशयित व पीडित महिला एकमेकांचे शेजारी असून ते जेलरोड परिसरातील शिवाजीनगर भागात वास्तव्यास आहेत. दोघे एकाच सोसायटीतील एकमेकांचे शेजारी असल्याने संशयिताने वेगवेगळया कारणाने महिलेच्या घरात जावून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले. गेल्या गुरूवारी दोघांची सोसायटीच्या जीन्यात भेट झाली असता त्याने तु गुलाबी साडीत हॉट दिसते असे संबोधल्याने महिलेने पोलिसात धाव घेतली असून पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक हांडोरे करीत आहेत.