नाशिक : इलेक्ट्रीक व कपड्याचे दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे ४७ हजाराचा ऐवज लंपास केला. ही घटना सातपूरला खोका मार्केट भागात घडली. यात चोरट्यांनी लॅपटॉप, मोबाईल आणि कपड्यांची चोरी केली आहे. संदिप रामसेवक राव (रा.शिवाजीचौक,सातपुर ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राव यांचे खोका मार्केटमध्ये शिवम इलेक्ट्रीक व क्लॉथ वेअर नावाचे दुकान आहे. टपरी वजा दुकानाचे छतावरील लोखंडी पत्रा उचकटून चोरट्यांनी ही चोरी केली. ही घटना शुक्रवारी (दि.८) रात्री घडली. दुकानात शिरलेल्या चोरट्यांनी दुकानातील जुना लॅपटॉप,विक्रीसाठी असलेले मोबाईल अॅक्सेसरीज,स्पिकर,ब्ल्यू ट्यूथ,हेडफोन व ४० शर्ट आणि दहा पॅण्ट असा ४७ हजार ३२० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.