नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत नगर भागात कुटुंबिय घरात असताना खिडकीतून हात घालत दरवाजा उघडून चोरट्यांनी रोकडसह तीन मोबाईल लंपास केले. या चोरीप्रकरणी फैजल इस्तेखार शेख (रा.सरकार मेडिकल समोर भारत नगर) यांनी तक्रार दिली असून मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख कुटुंबिय बुधवारी घरात असताना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी खिडकीतून हात घालत मुख्य प्रवेशद्वाराची आतून लावलेली कडी उघडून ही चोरी केली. कुटूंबियाचे लक्ष नसल्याची संधी साधत घरात शिरलेल्या चोरट्याने तीन मोबाईल व साडे सात हजाराची रोकड असा सुमारे २६ हजाराचा ऐवज हातोहात लांबविला. अधिक तपास पोलीस नाईक बहिरम करीत आहेत