नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील दादावाडी येथे मंदिरात शिरून चोरट्यांनी दानपेटीतील रोकड लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी सुनिल शिरसाठ (रा.बिडी कामगार नगर) यानी तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दादावाडी येथील कांतीमनी विहार मंदिरात घडली. अज्ञात चोरट्यांनी गेल्या बुधवारी मंदिराचा पाठीमागील दरवाजा उचकटून ही चोरी केली. मंदिरात शिरलेल्या चोरट्यांनी गाभाऱ्यातील दानपेटीत बाहेर उचलून नेत सुमारे पाच हजारांहून अधिक रोकड चोरून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक सुभाष जाधव करीत आहेत.