नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बंद घराच्या किचनचा दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी पावणे तीन लाखाच्या ऐवज लंपास केला. ही घरफोडी टागोरनगर भागात झाली. अंशू विजय भारती (रा.कोनार्क नगर) यांनी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती यांचे आई वडिल टोगोरनगर येथील गोकूळ नगरी भागातील जुगल रो हाऊस मध्ये राहतात. आई वडिल गेल्या शुक्रवारी (दि.९) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या किचनचा दरवाजाचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सुमारे २ लाख ७५ हजार रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.