नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन मोटारसायकली चोरीला गेल्या आहे. याप्रकरणी सरकारवाडा आणि भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना कोकणीपूरा भागात घडली. शाकिररजा जिलानी खतीब (रा.खतीब मंजील,कोकणीपूरा फुले मार्केट) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. खतीब यांची सुझूकी अॅक्सेस एमएच १५ जीडब्ल्यू ६५०१ गेल्या १६ नोव्हेंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या चोरी प्रकरणी समीर परवेज खान (३२) व सुफियान अब्दूल हमीद खान (२३ रा.मदिनानगर,वडाळागाव) या दोघांना जेरबंद केले असून अधिक तपास पोलिस नाईक काकड करीत आहेत. दुसरी घटना ठक्कर बाजार बसस्थानकात घडली. सातपूर येथील नितीन नथू अहिरे (रा.त्रिमुर्तीचौक,विष्णूनगर श्रमिकनगर) हे गेल्या २७ नोव्हेंबर रोजी ठक्कर बाजार बसस्थानक भागात आले होते. बसस्थानकाच्या पार्किंगमध्ये त्यांनी आपली प्लॅटीना एमएच १५ बीएस ५१२६ पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक गायकवाड करीत आहेत.