नाशिक : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सिडकोतील वेगवेगळया एटीएम बुथ मधून चोरट्यांनी बॅट-या चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने एटीएम बुथची सुरक्षा चव्हाट्यावर आली असून याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलींद काशिनाथ नेहे (रा.आशिर्वाद नगर,एकलहरा रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. नेहे स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएम बुथ देखभाल दुरूस्तीचे काम बघतात. सिडकोतील सिंहस्थनगर,कामटवाडा आणि महाराणा प्रताप चौकात असलेल्या एटीएम बुथ मध्ये ही घटना घडली. मंगळवारी (दि.५) अज्ञात चोरट्यांनी तिन्ही बुथ मधील सुमारे ६३ हजार रूपये किमतीच्या पंधरा बॅटºया चोरून नेल्या. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.