नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आई-वडिलांनी हट्ट पुरवला नाही म्हणून सातपूरच्या अशोकनगर परिसरात अक्षय खेताडे या २३ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. नवीन मोबाइल घ्यायचा असल्याने अक्षयने आपल्या पालकांकडे पैशाची मागणी केली. पण, अक्षयला मद्याची नशा करण्याची सवय होती. त्यामुळे आई-वडीलांनी पैसे देण्यास नकार दिला. त्याचाच राग धरून अक्षयने आई-वडील घरात झोपल्याचे लक्षात येताच बाहेरून घराचा दरवाजा लावला आणि पाचव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. या घटनेची पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली. पोलीस तपासात या आत्महत्या मागील कारण समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण सातपुर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.