नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कामटवाड्यात साडे सात लाख रूपये नाही दिले तर पतीस उचलून नेत त्याच्या किडण्या विक्री करण्याची महिलेला धमकी देणा-या विरुध्द अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातून ही धमकी दिल्याचे समोर आले आहे. वैभव माने असे महिलेस धमकी देणा-या संशयिताचे नाव आहे. याबाबत अश्विनी भावसार (रा.अभियंतानगर) या महिलेने तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या पतीचे संशयिताशी आर्थिक व्यवहार आहेत. गुरूवारी (दि.८) संशयितासह त्याच्या एका साथीदाराने महिलेचे घर गाठून पैश्यांची मागणी केली. यावेळी त्याने आज साडे सात लाख रूपये नाही दिले तर पतीस उचलून नेत त्याच्या किडण्या विक्री करण्याची धमकी दिली. भेदरलेल्या महिलेने पोलिसात धाव घेतली असून, अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.