नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाभानगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी कपाटातील साड्या व संसारोपयोगी वस्तू चोरून नेल्या. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय दशरथ नायडू (रा.शितल विहार सोसा.उन्मेश हॉल जवळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. नायडू कुटुंबिय २० ऑक्टोबर ते ७ डिसेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या पाठीमागच्या दरवाजाचे लोखंडी ग्रील तोडून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील जुन्या पैठणी, टिव्ही व संसारोपयोगी वस्तू चोरून नेल्या. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.