नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हनुमानवाडी भागात विवाह सोहळय़ासाठी आलेल्या महिलेची पर्स चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. पर्समध्ये रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे व मोबाईल असा सुमारे साडे चार लाख रूपयाचा ऐवज होता. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजया नंदकुमार कुलथे (रा.ठाकरे मळा,वृंदावननगर हिरावाडी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कुलथे या बुधवारी (दि.७) विवाह सोहळया निमित्त हनुमानवाडीतील धनदाई लॉन्स येथे गेल्या होत्या. गोरज मुहूर्तावर लग्न असल्याने त्या लॉन्समध्ये खुर्चीवर बसलेल्या असतांना ही घटना घडली. दुस-या खुर्चीवर पर्स ठेवून त्या नातेवाईक महिलांशी गप्पा मारत असतांना अज्ञात भामट्यांनी त्याची पर्स चोरून नेली. पर्स मध्ये ७० हजाराची रोकड, सोन्याचांदीचे दागिणे मोबाईल घड्याळ असा सुमारे ४ लाख ५६ हजाराचा ऐवज होता. अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.