नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना कलानगर भागात घडली. भाविका विनोद चोपडा (रा.गुरूमाऊली बंगला,लेन नं.१) असे मृत मुलीचे नाव आहे. भाविकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. भाविका चोपडा हिने गुरूवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घराच्या गॅलरीतील रूममध्ये लोखंडी हुकाला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात तिचा मृत्यू झाला. याबाबत वडिल विनोद अशोकलाल चोपडा यांनी दिलेल्या खबरीवरून म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार रानडे करीत आहेत.