नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडनेर पाथर्डी मार्गावर मोटारसायकलच्या अपघातात ६२ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दयाल विशनदास परयानी (रा.भगत अपा.संसरीनाका,दे.कॅम्प) असे अपघातात ठार झालेल्या वृध्द दुचाकीस्वाराचे नाव आहे. परयानी गुरूवारी (दि.८) पाथर्डी फाटा भागात आले होते. रात्रीच्या सुमारास ते आपल्या दुचाकीने घराकडे जात असतांना हा अपघात झाला. हॉटेल एक्सप्रेस इन कडून ते देवळाली कॅम्पच्या दिशेने दुचाकीवर प्रवास करीत असतांना पाथर्डी वडनेर मार्गावर मोटारसायकलला अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने कुटूबियांनी त्यांना तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास जमादार सातभाई करीत आहेत.