नाशिक : सातपूर औद्योगीक वसाहतीतील एका कारखान्यात व्यवस्थापकाने आपल्या सहकारी महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपूर औद्योगीक वसाहतीतील एका नामांकित कारखान्यात संशयित महाव्यवस्थापक असून महिलाही ज्यूनिअर व्यवस्थापक आहे. संशयिताने गर्भवती काळात सहकारी महिलेस काम सोडण्याचा सल्ला दिला होता. महिलेने राजीनामा देण्यास नकार दिल्याने संतप्त संशयिताने गेल्या १७ मे रोजी सकाळच्या सुमारास वेअर हाऊस मधील आपल्या कॅबीनमध्ये बोलावून घेत हे कृत्य केले. व्यवस्थापक असलेल्या महिलेच्या खांद्यावर हात ठेवून त्याने विनयभंग केला. यावेळी महिलेने हात झटकून त्यास जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्याने शिवीगाळ केल्याने महिलेने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक मोतीलाल पाटील करीत आहेत.