नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई- नाशिक महामार्गावर वाडीव-हे फाट्या जवळ आज सकाळी झालेल्या स्कुटी व कारच्या अपघातात दोन जण जखमी झाले आहे. रवी विजय गावंडे (३१), अक्षय विजय गावंडे (२८) रा. सिडको ही जखमी स्कुटीस्वाराची नावे आहेत. नाशिकडून मुंबईकडे स्कुटीस्वार जात असतांना कारने जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. यात स्कुटीवरचे दोन्ही जण जखमी झाले. या अपघातानंतर जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या गोंदे फाटा येथे सदैव अपघातग्रस्तांसाठी कार्यरत असणारी मोफत रुग्णवाहिका घटनास्थळी आली. या रुग्णवाहिकेत दोन्ही जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.