नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –औरंगाबादरोडवरील सेलिब्रेशन लॉन्स येथे लग्न सोहळ्यात व-हाडी म्हणून आलेल्या इंदोर येथील महिलेची पर्स चोरट्यानी लंपास केली. या पर्स मध्ये ३५ हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे व मोबाईल असा सुमारे ६७ हजार रूपये किमतीचा ऐवज होता.
या चोरीची रत्ना दिलीप दिंडोरकर (रा.इंदोर,मध्यप्रदेश) यांनी तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिंडोरकर या गुरूवारी (दि.१) नातेवाईकच्या विवाह सोहळय़ानिमित्त नाशकात आल्या होत्या. औरंगाबाद रोडवरील सेलिब्रेशन लॉन्स येथे रात्रीच्या सुमारास लग्नातील धार्मिक विधी सुरू असतांना त्या वधू वराच्या स्टेजजवळ जावून बसल्या असता ही घटना घडली. दिंडोरकर यांचे लक्ष नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांची पर्स चोरून नेली. या पर्स मध्ये ३५ हजाराची रोकड, दोन कानातील टॉप्स जोर आणि मोबाईल असा सुमारे ६७ हजार रूपयांचा ऐवज होता. अधिक तपास जमादार गायकवाड करीत आहेत.