नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वासाळीगाव येथे चोरट्यांनी सात हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ६९ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्विनी बाजीराव सातपुते (रा.मारूती मंदिरा समोर,वासाळीगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. सातपुते कुटुंबिय गुरूवारी सकाळच्या सुमारास आपल्या घरकामात व्यस्त असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यानी उघड्या घरात शिरून बैठक रूममधील कपाटात ठेवलेली सात हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ६९ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.