नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वेगवेगळया भागात दोन जणांनी शुक्रवारी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहे. याप्रकरणी उपनगर आणि सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पहिली घटना औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात घडली. समाधान भिकचंद गांगुर्डे (३० रा.हरीओम अपा.आयटीआय कॉलनी) यांनी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून छताच्या अँगलला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही घटना लक्षात येताच भाऊ प्रशांत गांगुर्डे यांनी त्यास खाली उतरवून जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक वाघमारे करीत आहेत.
दुसरी घटना नाशिक पुणे मार्गवरील गांधीनगर भागात घडली. येथे राहणारे लहू रामभाऊ हंगरगे (३३ रा.जी २३३,प्रेस कॉर्टर) यांनी शुक्रवारी आपल्या घरातील बेडरूममध्ये अज्ञात कारणातून पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शेजवळ करीत आहेत.