नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मखमलाबाद रोडवरील स्वामी जनार्दन नगर येथे रस्त्याने पायी जाणा-या ६२ वर्षीय महिलेच्या गळय़ातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदूबाई शिवाजी केकाण (रा.सप्तशृंगी बंगला,स्वामी जनार्दन नगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. केकाण या बुधवारी (दि.३०) सायंकाळच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. मखमलाबाद रोडवरील दौलत बंगल्या समोरून त्या पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ््यातील सुमारे १ लाख २० हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र ओरबाडून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.