नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औदयोगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात असलेल्या फाशीच्या डोंगरावर २८ वर्षीय तरूणाने आत्महत्या केली. रामनगौडा बिमनगौडा पिरापुर (रा.हिदी शाळेजवळ,श्रमिकनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. गुरूवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना समोर आली. झाडास दोरी बांधून गळफास लावून घेत पिरापुर याने आपले जीवन संपविले असून त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोद करण्यात आली आहे. पिरापुर याने गुरूवारी (दि.१) अज्ञात कारणातून फाशीच्या डोंगराच्या पुर्व बाजूस असलेल्या जंगलातील एका झाडास दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. सचिन पिरापुर यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चौधरी करीत आहेत.