नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सय्यद पिंप्री रोड भागात चक्कर येवून पडल्याने ८३ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. केशव गौराजी बासरकर (रा.हिंदूस्थाननगर,सय्यद पिंपरी रोड आडगाव) असे मृत वृध्दाचे नाव आहे. बासरकर यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बासरकर गेल्या २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अचानक चक्कर येवून पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ लोकमान्य रूग्णालयात दाखल केले होते. बुधवारी (दि.३०) रात्री उपचार सुरू असतांना डॉ.ओंकार गवळी यांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार डापसे करीत आहेत.