नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात दोन दुचाकी चोरीस गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सातपूर आणि अंबड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पहिली घटना सिडकोत घडली. शांतीलाल गंभीर चव्हाण (रा.नामको बँक पाठीमागे राजरत्ननगर,पवननगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चव्हाण यांची एमएच १५ एझेड ९३३२ स्कुटी गेल्या ६ नोव्हेंबर रोजी रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक परदेशी करीत आहेत. दुसरी घटना औद्योगीक वसाहतीतील समता नगर भागात घडली. येथे राहणारे हंसराज सुभाष पवार हे गेल्या १९ नोव्हेंबर रोजी परिसरातील तरणतलाव मैदान भागात गेले होते. या ठिकाणी पार्क केलेली त्यांची स्प्लेंडर एमएच १५ बीझेड ०३८५ चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.