नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कार्यालयातील चार लॅपटॉप चोरुन नेणा-या नोकराविरुध्द मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित नोकरास पोलिसांनी अटक केली आहे. प्रसिध्द बांधकाम व्यावसायीकाच्या कार्यालयातून ही चोरी करण्यात आली होती .अजय बुधा झोले (२४ रा.विजयनगर कॉलनी,जनार्दननगर) असे लॅपटॉप पळविणा-या संशयित नोकराचे नाव आहे. याप्रकरणी सुधाकर पाटील (रा.गणेश चौक,सिडको) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ही घटना अशोका मार्गावरील एका प्रसिध्द बांधकाम कंपनीच्या कार्यालयात घडली. संशयित झोले या नोकराने २१ ते २६ नोव्हेंबर दरम्यान कार्यालयातील सुमारे दोन लाख रूपये किमतीचे चार लॅपटॉप चोरून नेले. संशयितास अटक करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक बाळू गिते करीत आहेत.