नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –शिलापूर येथील आझाद नगर भागात बंद घराची खिडकी उघडून चोरट्यांनी घरात शिरून सुमारे दोन लाखाच्या रोकडसह साडे पाच लाख रूपये किमतीचे दागिणे लंपास केले. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश मधूकर कहांडळ यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कहांडळ कुटुंबिय मंगळवारी (दि.२९) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या किचनची खिडकी कशाने तरी उघडून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममध्ये ठेवलेली धान्याच्या कोठीतील दागिणे आणि टांगलेल्या बॅगेतील एक लाख ८७ हजार रूपयांची रोकड असा सुमारे ५ लाख ५८ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक संतोष शिंदे करीत आहेत.