नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – साईनाथनगर सिग्नल ते इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक दरम्यान भरधाव दुचाकी घसरल्याने एकाचा मृत्यू झाला.अमित विजयकुमार देशमुख (३५ रा.विश्वजीत अपा.रथचक्र चौक,इंदिरानगर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. देशमुख बुधवारी (दि.३०) रात्री मित्र गणेश गांगुर्डे याच्या समवेत दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. साईनाथ सिग्नल कडून इंदिरानगर जॉगिग ट्रॅकच्या दिशेने दोघे मित्र दुचाकीवर जात असतांना भरधाव दुचाकी घसरली. या अपघातात देशमुख याच्या डोक्यास मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. कुटूंबियांनी तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक बहिरम करीत आहेत.