नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे गाव भागातील उड्डाणपूलावर भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. संदिप विष्णू वाजे (३० रा.नवीन सामनगाव) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. वाजे बुधवारी (दि.३०) नाशिक – पुणे मार्गावरून आपल्या दुचाकीने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. शिंदे गाव परिसरातील उड्डाणपूलावरून तो जात असतांना अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने शिंदे टोलनाका कर्मचारी पंढरीनाथ गिते यांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी डॉ. राहूल पाटील यांनी त्यास मृत घोषीत केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस नाईक पुंडलिक ठेपणे करीत आहेत.