झाडावरून पडल्याने ६४ वर्षीय वृध्दाचा मृत्यू
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मखमलाबाद शिवारातील शांतीनगर भागात झाडावरून पडल्याने ६४ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. मोतीराम शंकर आहेर (रा.रामकृष्ण कॉलनी,शांतीनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आहेर मंगळवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास आपल्या घराशेजारील झाडावर चढले होते. अचानक फांदी तुटल्याने ते जमिनीवर कोसळले. या घटनेत त्यांच्या डोक्यास व मानेस गंभीर दुखापत झाल्याने मुलगा विशाल आहेर यांनी त्यांना तात्काळ आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार भोज करीत आहेत.
बिल्डींगच्या टेरेसवरून पडल्याने ९५ वर्षीय वृध्देचा मृत्यू
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औरंगाबादरोडवरील कैलासनगर भागात बिल्डींगच्या टेरेसवरून पडल्याने ९५ वर्षीय वृध्देचा मृत्यू झाला.सिंधूबाई निवृत्ती दिघे (रा.यमुना अपा.मिरची हॉटेल मागे) असे मृत वृध्देचे नाव आहे. दिघे या मंगळवारी (दि.२९) आपल्या घराशेजारील इन्क्लू बिल्डींगच्या टेरेसमध्ये उभ्या असतांना ही घटना घडली. अचानक तोल गेल्याने त्या जमिनीवर कोसळल्या होत्या. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस नाईक जाधव करीत आहेत.