नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नगर जिल्ह्यातील कोळपेवाडी येथील तरुणाने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून त्र्यंबकरोडवरील लॉजमध्ये घेवून जात बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणाची मुलीच्या आईने तक्रार दिली असून संशयिताविरोधात बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल धनगर असे संशयिताचे नाव आहे. अल्पवयीन पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संशयित आणि पीडिता एकमेकांचे परिचीत आहे. संशयिताने तिला प्रेमात अडकवून लग्नाचे आमिष दाखविले. गेल्या १४ जून रोजी दुपारच्या सुमारास मुलीशी संपर्क साधून घराजवळून दुचाकीवर बसविले. त्यानंतर त्र्यंबकरोडवरील एका लॉज मध्ये घेवून जात बलात्कार केला. यावेळी संशयिताने तुझे १८ वर्ष वय झाले की लग्न करू अशी बतावणी केली. तसेच या घटनेची वाच्यता करू नये यासाठी दमदाटीचे केल्याचे महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.