नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात वेगवेगळय़ा भागात झालेल्या तीन घरफोडींमध्ये चोरट्यांनी साडे पाच लाख रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीच्या दागिणे चोरुन नेले. याप्रकरणी गंगापूर आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पहिली घटनेची तक्रार पाथर्डी फाटा भागात राहणारे किशोर रविंद्र पवार (रा.महालक्ष्मी रो हाऊस,टुपिल हॉस्पिटल मागे) यांनी दाखल केली आहे. तक्रारदार पवार आणि शेजारी राहणारे रविंद्र वसंत कुर्चे यांचे बंद घरे फोडून चोरट्यांनी २० हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ५५ हजाराचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि.२६) रात्री घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सय्यद करीत आहेत. तिस-या घटनेची तक्रार गंगापूररोड भागातील रेखा जयेश रॉय (रा.लिबर्टी ग्लोरी अपा.जवळ शारदानगर,सावरकरनगर) यांनी दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, रॉयकुटुंबिय रविवारी (दि.२७) बाहेरगावी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या पहिल्या माळय़ावर चढून गॅलरीच्या दरवाज्यातून प्रवेश करीत बेडरूममधील कपाटातून सुमारे ४ लाख ७८ हजार ५०० रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक भिसे करीत आहेत.