नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २५ टन लोंखडी सळईने भरलेला पार्क केलेला मालट्रक चोरट्यांनी पळवून नेल्यची धक्कादायक घटना घडली आहे. स्टीलसह मालट्रक असा ४० लाख रूपये किमतीचा होता. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक लखन करीत आहेत. टाकळी येथील वाल्मिक माधव इपरदास (रा.जोशीवाडा) यांच्या मालकिचा २५ टन लोंखडी सळईने भरलेला मालट्रक चोरट्यांनी पळवून नेला. ही घटना रविवारी (दि.२७) रात्री टाकळी येथील धोबीघाट परिसरातील रामदास स्वामी पुल परिसरात घडली. इपरदास यांनी आपल्या एमएच १५ डीके २३५५ या मालट्रकमध्ये सुमारे १४ लाख रूपये किमतीचे स्टील भरूण आणले होते. सकाळी ग्राहकास पोहच करण्यासाठी ते रवाना होणार होते. मात्र उशीर झाल्याने त्यांनी रात्री रामदास स्वामी पुलाजवळ रस्त्याच्या कडेला आपला मालट्रक पार्क केला असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी